काँग्रेसचा दणका! माजी आमदाराचे ६ वर्षांसाठी निलंबन; ‘या’ कारणामुळे केली नाना पटोलेंनी कारवाई

Congress Nana Patole| लोकसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघडीने चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत. यात काँग्रेस पक्षाने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. त्यानंतर आता काँग्रेसने पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी दोन नेत्यांचे निलंबन केले आहे. त्या संदर्भातील पत्र देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर शेअर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे या नेत्यांना पक्षातून निलंबित केले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंना जाहीर पाठींबा देणारे काँग्रेसचे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
Maharashtra Congress has suspended Former MLC Naraynrao Munde from the party for 6 years.
According to MPCC Narayan Munde is suspended for 6 years for being involved in anti-party activity in the recently concluded Lok Sabha Elections. pic.twitter.com/Z87XuUqkoM
— ANI (@ANI) June 12, 2024
नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली होती. पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली होती. येथे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. गावंडे यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांच्याविरोधात वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचे काम केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. प्रशांत गावंडे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र पक्षाने अभय पाटील यांना उमेदवारी दिली. परंतु यात त्यांचा पराभव झाला.
यासंदर्भातील अधिकृत निलंबनाचं पत्रात म्हंटले की, लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळं विधानपरिषदेचे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा :





