Congress Haryana Candidate List| हरियाणा विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाने रविवारी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत 9 उमेदवारांची नावे आहेत. पक्षाने भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले ब्रिजेंद्र सिंह यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे.. या जागेवर त्यांची लढत जेजेपी प्रमुख दुष्यंत चौटाला यांच्याशी होणार आहे.
तर अनिरुद्ध चौधरी तोशाममधून, वर्धन यादव यांना बादशाहपूरमधून, तोहानामधून परमवी सिंग, ठाणेसरमधून अशोक अरोरा, मंजू चौधरी यांना नांगल चौधरीमधून, मेहममधून बलराम डांगी, गुरुग्राममधून मोहित ग्रोवर यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय माजी विधानसभा अध्यक्ष कुलदीप शर्मा यांना गन्नौर विधानसभेचे तिकीट मिळालं आहे.
अशोक अरोरा यांना ठाणेसर विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. ते यापूर्वी इनोलोचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. काही काळापूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अनिरुद्ध चौधरी यांना तोषम विधानसभेचे तिकीट मिळाले आहे. कुलदीप शर्मा हे विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. मोहित ग्रोवर यांनी गुडगावमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, यावेळी काँग्रेसने त्यांना टोहाना येथून तिकीट दिले आहे, ते 2009 मध्ये हुड्डा सरकारमध्ये मंत्री होते. Congress Haryana Candidate List|
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में हरियाणा विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की दूसरी लिस्ट। pic.twitter.com/ZxRF3Zuyku
— Congress (@INCIndia) September 8, 2024
काँग्रेसने आतापर्यंत 41 जागांसाठी उमेदवार जाहीर केले
याआधी काँग्रेसने 32 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. ज्यामध्ये 28 विद्यमान आमदारांचा समावेश होता. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांपैकी काँग्रेसने आतापर्यंत 41 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. Congress Haryana Candidate List|
भाजपने 67 उमेदवार जाहीर केले आहेत
राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपने बुधवारी पहिली यादी जाहीर केली. यामध्ये 67 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. भाजपच्या या यादीत 16 ओबीसी, 13 जाट, 13 एससी, 9 ब्राह्मण, 8 पंजाबी, 5 वैश्य, 2 राजपूत, 1 शीख जातीचे नेते उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.
कॉंग्रेस आणि आपमध्ये होणार समझोता ?
कॉंग्रेस आणि आपमध्ये अखेर समझोता दृष्टीपथात आल्याची माहिती रविवारी आपमधील सुत्रांनी दिली. कॉंग्रेस नेते दिपक बाबरिया आणि आपचे नेते राघव चढ्ढा यांच्यातील चर्चा सकारात्मक दिशेने जात आहे. दोन्ही पक्षांमधील आघाडीवर आज अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकेल. आपने हरियाणात ५ जागा लढवण्याविषयी सहमती दर्शवली आहे, असे त्या सुत्रांनी नमूद केले. Congress Haryana Candidate List|
हरियाणात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. त्यातील १० जागा आघाडी झाल्यास लढवण्याचा प्रस्ताव आपने मांडला होता. मात्र, कॉंग्रेसने आपसाठी ७ पेक्षा अधिक जागा सोडण्यास नकार दर्शवला. दोन्ही पक्ष आपापल्या जागांवर ठाम राहिल्याने त्यांच्यातील वाटाघाटींना ब्रेक लागल्याचे पुढे आले असून आपने शनिवारी कॉंग्रेसला अप्रत्यक्षपणे इशारा दिला.
हेही वाचा:
‘मुस्लिमांमध्ये मोजकेच लोक आहेत जे…’ ; ज्येष्ठ संघ प्रचारक इंद्रेश कुमार स्पष्टच बोलले