मुंबई – काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बॉलिवूडचा डंका पाहायला मिळाला. अभिनेत्री क्रिती सॅननला मिमी चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय आलिया भट्टला गंगूबाई काठियावाडीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. क्रितीच्या मिमी या चित्रपटात मराठमोळळी अभिनेत्री सई ताम्हणकर हीची देखील महत्त्वपूर्ण भूमिका होती. पुरस्कार मिळाल्यानंतर क्रितीसाठी सईने खास पोस्ट शेअर केली आहे.
मिमी’ मध्ये क्रिती सेननच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक झालं. शिवाय मराठमोळ्या अभिनेत्रीनेही सिनेमात लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेत्री सई ताम्हणकरने सिनेमात क्रितीच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर सईने क्रितीसाठी एका खास पार्टीचे आयोजन केले होते. याचे काही फोटो शेअर करत सईने क्रितीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
सईने लिहिले, ”एवढ्या मोठ्या सन्मानासाठी आणि यशाबद्दल माझ्या सुंदरीचे हार्दिक अभिनंदन. आम्हाला खूप अभिमान वाटत आहे.” या पार्टीला पंकज त्रिपाठी उपस्थित नव्हते. त्यांच्याबद्दल सईने पोस्टमध्ये लिहिले की, “पंकजजी आम्ही तुमची खूप आठवण काढली. तुमचेही अभिनंदन, तुमच्याकडून खूप शिकलो आहे, शिकत राहू.” पंकज यांनाही ‘मिमी’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या चित्रपटाचे लेखक लक्ष्मण उतेकर आणि दिग्दर्शक राजेश भाटिया यांचे काम चांगले होते. आणि क्रितीचा परफॉर्मन्स भारीच होते. क्रिती सेननने पहिल्यांदाच काहीतरी आऊट ऑफ द बॉक्स केले आणि ती यशस्वी झाली. या चित्रपटात तिने एका आईची भूमिका केली आहे, जी पैशासाठी परदेशी जोडप्याच्या मुलासाठी सरोगेट मदर बनण्यास तयार होते. मात्र, जेव्हा परदेशी जोडप्याला समजले की मिमी म्हणजेच क्रितीचे न जन्मलेले मूल मानसिक आजारी आहे, तेव्हा ते पळून जातात. मग मिमी या कठीण परिस्थितीचा सामना कसा करते आणि पंकज त्रिपाठी तिला कसा पाठिंबा देतात, ही या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.