BBC Documentary स्क्रिनिंगवरून कॉलेजमध्ये गोंधळ.. प्रशासनने केली वीज कट

नवी दिल्ली – बीबीसीने बनवलेल्या डॉक्युमेंट्रीवरून चांगलाच राजकारण सुरु झालं आहे. ठीक ठिकाणी या डॉक्युमेंट्री विरोधात काही संघटना तसेच सत्ताधारी पक्षाला समर्थन करणारे लोक आक्रमक होताना दिसत असल्याचे समोर येत आहे. हैदरबादमध्ये या डॉक्युमेंट्रीला उत्तर म्हणून द काश्मीर फाईल्स चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आल्याचा प्रकार ताजा असताना दिल्लीतील एका कॉलेजमध्ये देखील गोंधळ झाल्याचे समोर आले.
दिल्लीमधील आंबेडकर कॉलेजात बीबीसीच्या डाक्युमेंट्रीचे स्त्रीनिंग होणार होते मात्र प्रशासनाने तेथील वीज सप्लायच बंद केल्याचे समोर आले आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी या विरोधात जोरदार आंदोलन सुरु केले आहे. विद्यार्थ्यांनी थेट लॅपटॉपवर ही डॉक्युमेंट्री पाहायला सुरुवात केली. कॉलेज प्रशासनाने कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी कॉलेजच्यावतीने मेन गेटही बंद ठेवण्यात आले.
हिंदू कॉलेजच्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) युनिटने काल संध्याकाळी बीबीसी डॉक्युमेंटरी दाखवली होती. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरी दाखवण्यास कॉलेज प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर, कॅम्पसच्या बाहेर असलेल्या फ्लॅटच्या टेरेसवर सुमारे 50 विद्यार्थ्यांनी स्क्रीनिंग ठेवली.
काय आहे नेमकं या डॉक्युमेंट्रीमध्ये
गुजरातमध्ये झालेल्या दंगलींबाबत ही डॉक्युमेंट्री असून बीबीसीद्वारे बनवण्यात आली आहे.बीबीसीच्या या डॉक्युमेंट्रीवर सरकारने बंदी घातली आहे. दोन भागांमध्ये ही डॉक्युमेंट्री असणार आहे. मात्र त्याचा पहिलाच भाग अद्याप प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारने या डॉक्युमेंटरीवर पंतप्रधानांची बदनामी करण्यात येत असल्याचे सांगत बंदी घातली आहे.





