आप-भाजपमधील संघर्ष वाढणार ! दिल्लीत सुरू झाली झोपड्यांची पाडापाडी..

नवी दिल्ली – दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) रविवारी पूर्व गोकलपुरी येथील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्लीतील झोपडपट्ट्या पाडून तेथील जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने या आधीच केला होता.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी ईशान्य दिल्लीतील हरनाम पॅलेस, अमर कॉलनी, पूर्व गोकलपुरी येथे अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू झाली. सरकारी जागेवरील झोपड्यापाडून ती जागा दिल्ली विकास प्राधिकरण ताब्यात घेत आहे.
ईशान्य दिल्ली जिल्हा हा परिसर गुन्हेगारी आणि गुन्हेगारांपासून मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यानुसारच ही कारवाई सुरू आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
दरम्यान, या मोहीमेमुळे झोपडीवासीयांमध्ये दहशतीचे वातावरणनिर्माण केेले जात आहे, असे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे.





