Pune District : मेंदू विकार, मणका विकार तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

मंचर : मंचर (ता.आंबेगाव) येथील गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे गुरुवार, दि. १२ रोजी मेंदू विकार, मणका विकार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरासाठी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी नाव नोंदणी करावी. असे आवाहन डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. संचित लंघे यांनी केले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत डॉ. साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मंचर या ठिकाणी मेंदुविकार व मणक्याचे विकार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर गुरुवार, दि. १२ रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मेंदूमधील गाठी, सतत डोके दुखणे, झटके येणे, मानदुखी, अर्धांग वायू, कंबर दुखी, विसरभोळेपणा, मणक्याचे विकार, अचानक स्मृती भ्रंश, स्पॉडीलायटीस यासह विविध आजारांची तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर पार पडणार आहे.
या शिबिरात मेंदू व मणके विकार तज्ञ डॉ. विवेक बोंडे व डॉ. अभिजीत घंगाळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिरामध्ये मोफत नाव नोंदणी करण्यात येणार असून तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया होणार आहे. तसेच एक्स-रे, रक्त लघवी तपासणी, सिटीस्कॅन व एम आर आय तपासणीत सवलत मिळणार असल्याचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूषण साळी आणि डॉ. दीप्ती साळी यांनी दिली.





