संगमनेर – निमगाव टेंभी येथील घराजवळ काम करत असताना संगीता शिवाजी वर्पे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. माजी आमदार सुधीर तांबे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ.जयश्री थोरात व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी वर्पे कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. संगीता शिवाजी वर्पे (वय 42) या घराजवळ धुणं धुत होत्या. यावेळी शेजारी गिन्नी गवतात दबा धरून बिबट्याने त्यांच्यावर मागून हल्ला केला.यावेळी बिबट्याने त्यांची मान पकडली व त्यांना ओढत नेले. आरडाओरडा केल्याने बिबट्याने त्यांना सोडले. तातडीने संगीता वरपे यांना संगमनेर येथे उपचारासाठी आणले,मात्र यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी समजतात आमदार बाळासाहेब थोरात हे मुंबईत असल्याने त्यांनी गावातील कार्यकर्त्यांच्या संवाद साधून तातडीने मदतीच्या सूचना दिल्या. याचबरोबर दूरध्वनीद्वारे शिवाजी वरपे यांचेही सांत्वन केले. मा.आ. डॉ.सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात यांनीही तातडीने वरपे कुटुंबीयांना भेट दिली. यानंतर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही कुटुंबीयांचे सांत्वन केले. याप्रसंगी गावातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.