पिंपरी | सुकन्या समृद्धी योजनेचे भरुन घेतले अर्ज

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – भारतीय टपाल विभागाचा डाक चौपाल या कार्यक्रमाचे उद्घाटन भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण व संजय काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लहान मुलींचे सुकन्या समृद्धी योजना फॉर्म भरुन घेण्यात आले. पहिल्या एक हजार मुलींचा पहिला हप्ता संजयनाना काटे हे भरणार आहेत.
उपविभागीय डाक निरीक्षक कौशल कुलकर्णी, चिंचवड मुख्यालयाचे जनसंपर्क डाक निरीक्षक के एस पारखी, पिंपरी मुख्यालयाचे जनसंपर्क डाक निरीक्षक नितीन बने, संगणक व्यवस्थापक अनिल खांडेकर,विशाल भोपळे उपस्थित होते.
ही योजना दोन दिवस चालू होती व या योजनेत येणाऱ्या अडचणी सोडवून व्यवस्थित फॉर्म भरून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. राजकिशोर बद्रीश्वर भोसले,
नायक सांगडे, सुधाकर गोरड, सिद्धार्थ गाडे, आरती चौडेकर, अशोक अवघडे यावेळी प्रमुख उपस्थिती यावेळी डॉक्टर प्रशांत ढवळे डॉक्टर अरुण पाटील डॉक्टर संदीप बांगर वराजू भास्कर उपस्थित होते.




