शिंदे सरकारची मोठी घोषणा ! मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर संपूर्ण टोलमाफी ; आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी

Complete Toll Waiver । राज्यात आता विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रालयात हालचालींचा वेग वाढला आहे. आज महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीच्या संदर्भात मोठी गोपनीयता
महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या संदर्भात मोठी गोपनीयता ठेवण्यात आली आहे. मंत्रीमंडळ बैठकीचा अजेंडा मंत्र्यांना थेट बैठकीत दिला जाणार आहे. बैठकीच्या आधी कोणत्याही मंत्र्यांना किंवा अधिका-यांना अजेंडा दिला गेला नाही . त्यामुळे आयत्यावेळी अनेक निर्णय होणार आहे.
टोल माफीचा राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा
मुंबईतील टोल माफीचा मोठा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. मुंबईतील पाच टोलनाक्यावरील टोलमाफीचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारला जवळपास पाच हजार कोटी रुपये संबंधित कंत्राटदाराना द्यावा लागणार आहे. पाच टोलपैकी चार टोलची मुदत 2027 पर्यंत आहे तर एक टोल 2029 पर्यंत आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना टोल माफी मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी लोकप्रिय घोषणा आहे.
#WATCH | Maharashtra Govt announces full toll exemption for all light motor vehicles entering Mumbai.
Maharashtra minister Dadaji Dagadu Bhuse says “At the time of entry into Mumbai, there were 5 toll plazas, including Dahisar toll, Anand Nagar toll, Vaishali, Airoli and Mulund.… pic.twitter.com/jTsy4nKvN2
— ANI (@ANI) October 14, 2024
कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी? Complete Toll Waiver ।
* आनंदनगर टोलनाका
* दहिसर टोलनाका
* मुलुंड-एलबीएस टोलनाका
* वाशी टोलनाका
* ऐरोली टोलनाका
हलकी वाहने म्हणजे काय?
साधारण कार, जीप, ट्रॅक्टर आदी वाहनांना हलकी वाहने म्हटले जाते. ज्या वाहनांचे सरासरी वजन 7500 किलोग्रॅमच्या वर नसते, असा वाहनांना हलकी वाहने म्हटले जाते.





