नवी मुंबई विमानतळाचे काम 2024 पर्यंत पुर्ण करा
Updated On:

ठाणे – नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्याचे काम अदानी उद्योग समुहाकडून केले जात आहे. हे काम सन 2024 पर्यंत पुर्ण व्हावे अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उद्योग समुहाला केली आहे. पनवेल जवळील या विमानतळाच्या प्रकल्पाचे काम हे आर्थिक दृष्ट्या लाभदायी आहे.
त्यामुळे या निर्धारीत वेळेत हे काम होणे अवघड नाही. या कामाचा आम्ही नियमीतपणे आढावा घेणार आहोत असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून विकसित होणार आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हा नवीन विमानतळ 35 किमी अंतरावर आहे. पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वाने हा विमानतळ बांधला जात आहे. त्यात 74 भाग भांडवल हे अदानी उद्योग समुहाचे आहे आणि 26 टक्के भाग भांडवल महाराष्ट्र सरकारचे आहे.





