Actress Soundarya : घात की अपघात? 21 वर्षांनंतर अभिनेत्री सौदर्याच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

मुंबई : ‘सूर्यवंशम’ फेम अभिनेत्री सौंदर्या हिच्या मृत्यूला 21 वर्षे झाली आहेत. मात्र आता या मृत्यू प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. या ट्विस्टमुळे सौदर्यांचा मृत्यू घात होता की अपघात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी अभिनेते मोहन बाबू यांच्याविरुद्ध आंध्रप्रदेशमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत सौदर्याच्या मृत्यू हा अपघात नसून घात असल्याचे म्हंटले आहे.
कसा झाला अभिनेत्री सौदर्याच्या मृत्यू?
सौंदर्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौम्या सत्यनारायणचा 17 एप्रिल 2004 रोजी विमान अपघातात मृत्य झाला होता. विमान बेंगळुरूजवळील कृषी विज्ञान विद्यापीठाच्या गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या कॅम्पसमध्ये कोसळले. मात्र सौंदर्याच्या मृत्यूच्या 21 वर्षांनंतर तिचा मृत्यू हा अपघात नसून घात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी आंध्र प्रदेशातील खम्मम जिल्ह्यात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तेलुगू अभिनेता मोहन बाबूवर आरोप
अभिनेत्रीने मोहन बाबूला 6 एकर जमीन विकण्यास नकार दिला होता. मोहन बाबू ही गोष्ट सहन करू शकला नाही. त्यानंतर काही दिवसातच अभिनेत्री आणि तिचा भाऊ यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अनेक अहवालांनुसार, भारतीय जनता पक्ष आणि तेलगू देसम पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी करीमनगरला जात असताना त्यांचे विमान क्रॅश झाले होते. अभिनेत्री सौदर्याचा मृत्यू झाला तेव्हा ती गर्भवती होती. असा दावा तक्रारदाराकडून करण्यात आला आहे.
एवढंच नाहीतर अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर मोहन बाबूने तिच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला. तसेच अभिनेता मोहन बाबूमुळे त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याने संरक्षणाची मागणी केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर तेलुगू इंडस्ट्रीमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारणाऱ्या मोहन बाबूने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अभिनेत्री सौंदर्या बद्दल बोलायचे झाले तर तिने कन्नड, तमिळ, मल्याळम तेलुगू व्यतिरिक्त हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. 1999 मध्ये आलेल्या ‘सूर्यवंशम’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिने स्क्रीन शेअर केली होती. मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी 2003 मध्ये तिने सॉफ्टवेअर एक्झिक्युटिव्ह श्रीधरशी लग्न केले होते. तिचा मृत्यू झाला तेव्हा ती फक्त 32 वर्षांची होती.





