“पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करणे हे…” कोलकाता हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

कोची – पत्नीची इतर महिलांशी तुलना करणे आणि ती आपली अपेक्षा पूर्णकरणारा जोडीदार नसल्याचे नमूद करून तिला सतत टोमणे मारणे हे पतीकडून हे महिलांच्या बाबतीत होणारे मानसिक क्रौर्यच आहे असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
पत्नीपासून जवळपास 13 वर्षे विभक्त राहिल्यानंतर तिला पतीपासून घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध संबंधित पुरुषाने केरळ उच्च न्यायालयात अपिल केले होते ते अपील फेटाळताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.
1869 च्या घटस्फोट कायद्यानुसार या जोडप्याचा घटस्फोट उच्च न्यायालयाने कायम केला आणि हा घटस्फोट वर नमूद केलेल्या मानसिक क्रौर्यामुळे संमत केला जात आहे असा निर्णयही हायकोर्टाने दिला आहे.
पत्नी आणि तिच्या आईची याचिका, साक्ष आणि पतीने तिला अधिकृत ईमेल आयडीवर जीवनसाथीबद्दलच्या अपेक्षा व्यक्त करणारा पाठवलेला इमेल आणि तिला कसे वागावे याबद्दल सूचना देणारा ईमेल यावरून वरील निष्कर्ष काढण्यात आला.
सदर महिलेचा पती आपल्या पत्नीच्या सहवासात गुंतला नाही, कारण ती त्याला शारीरिकदृष्ट्या आकर्षक वाटली नाही. हे पत्नीविषयी असलेले औदासिन्यच ठरते त्यामुळे हा घटस्फोट कायम ठेवत हायकोर्टाने तिच्या पतीची याचिका फेटाळून लावली आहे.





