कोंढवा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : आमदार चेतन तुपे

कोंढवा : हडपसर विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या सहकार्याने विकासकामे सुरू आहेत. मतदार संघाचा सुनियोजित विकास हाच आमचा अजेंडा आहे. नियोजनबद्ध व कायमस्वरूपी विकासकामे मार्गी लागावीत यासाठी माझा नेहेमीच आग्रह राहिला आहे.कोंढवा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांनी केले.
तर कोंढवावासीय या विकासाला साथ देतील याबाबत आपल्या मनात कोणतीच शंका नसल्याचा विश्वासही आमदार तुपे यांनी या वेळी बोलून दाखवला. महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील कोंढवा येथील कुमार पाम सोसायटी मधील नागरिकांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी महापालिकेच्या माजी नगरसेविका नंदाताई लोणकर, माजी स्वीकृत नगरसेविका हसीना भाभी इनामदार, माजी नगरसेवक गफुर भाई पठाण, माजी नगरसेवक फारुख नाना इनामदार, रईस भाई सुंडके, समीर भाई शेख तसेच सोसायटीमधील सभासद उपस्थित होते. याशिवाय कोंढवा परिसरातील ब्रम्हा हॉरीझॉन सोसायटी येथेही तुपे यांनी भेट देऊन येथील नागरिकांशी हितगुज साधले.
सोसायटीचे अध्यक्ष झुबीन तावडीया व सचिव दीप्ती खेडेकर, माजी नगरसेवक गफूर भाई पठाण, हाजी फिरोज शेख, रईस भाई सुंडके आदिंसह सोसायटीचे सदस्य व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून हडपसर विधानसभा मतदार संघातील विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे. यातून अनेक कामे झाली आहेत. बरीच कामे सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व विकासकामे मार्गी लागतील. हडपसर आणि कोंढवा परिसराचा विकासकामांतून कायापालट केला जाईल.
चेतन तुपे
उमेदवार, महायुती हडपसर विधानसभा





