India vs Pakistan War : पाकिस्तानच्या गोळीबारात आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी

India vs Pakistan War : जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानच्या गोळीबारात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा यांचा मृत्यू झाला आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
राजौरी शहरातील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त उपायुक्त राजकुमार थापा आणि त्यांचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, आयुक्त राज कुमार थापा यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर त्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी थापा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Additional District Development Commissioner Raj Kumar Thappa dies in Pakistani shelling in Rajouri, tweets J&K CM Omar Abdullah pic.twitter.com/jgH7PyFvMj
— ANI (@ANI) May 10, 2025
त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हंटल की, “राजौरीहून आलेली विनाशकारी बातमी. आपण जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. कालच ते उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्याचा दौरा करत होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते.”
“आज, पाकिस्तानने राजौरी शहराला लक्ष्य करून केलेल्या गोळीबारात आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थप्पा यांना अधिकाऱ्याच्या निवासस्थानी प्राण गमवावे लागले,” असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या भयानक जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.

