मुंबई – लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant berde) आणि महेश कोठारे (Mahesh kothare) या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं. ,धुमधडाका,झपाटलेला,पछाडलेला,दे दणादण असे अनेक सुपरहिट चित्रपट या जोडीनं दिले. झपाटलेला या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांनी चांगलाच एन्जॉय केला. नुकतंच महेश कोठारे यांनी या चित्रपटाचा तिसरा भाग देखील लवकरच येणार असल्याची घोषणा एका मुलाखतीत केली.
एका सोशल मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीत महेश कोठारे यांनी झपाटलेला 3 (zapatlela 3) बाबत भाष्य केलं आहे. महेश कोठारे म्हणाले,आजवर मी लिहिलेल्या स्क्रिप्ट पैकी सर्वात चांगली स्क्रिप्ट ही झपाटलेला 3 ची आहे. लवकरच आंम्ही तात्या विंचूचा थरार पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत.
झपाटलेलाच्या दुसऱ्या भागाच्या शेवटी काहीसा सस्पेन्स ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रेक्षकांना देखील तिसऱ्या भागाची उत्सुकता लागली होती. AI च्या मदतीने तात्या विंचू (Tatya vinchu) पूर्णपणे डिजिटली क्रिएट करणार असल्याचं देखील यावेळी महेश कोठारे यांनी सांगितलं. या मुलाखतीचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहेत.
View this post on Instagram
या चित्रपटाचे नाव देखील बदलण्यात आल्याचे महेश कोठारे यांनी यावेळी स्पष्ट केले. झपाटलेला 3 ऐवजी आता ‘मी तात्या विंचू’ (Mi tatya vinchu) असे या चित्रपटाचे टायटल असणार असल्याचे देखील कोठारे यांनी यावेळी स्पष्ट केले. हा चित्रपट मोठ्या स्केलवरती बनवला जाणार असल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे.