कॉमेडियन समय रैनाने खरेदी केली आलिशान गाडी

Samay Raina New Car | कॉमेडियन समय रैनाने एक आलिशान गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर समयने त्याच्या नवीन गाडीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. समयच्या या नव्याकोऱ्या गाडीची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. त्याने नवी कार घेताच नेटकऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
समयने Toyota Vellfire ही 7 सीटर MPV गाडी खरेदी केली. मीडिया रिपोर्टनुसार, या गाडीची किंमत 1.2 ते 1.3 कोटी असण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर समयने ही गाडी खरेदी केली. आलिशान गाडीसोबत पोज देताना त्याचे काही फोटो समोर आलेत, यावेळी त्याचे आई-वडीलही उपस्थित होते.
View this post on Instagram
सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. समयने इन्स्टाग्राम स्टोरीवर आई-वडिलांसह पोज देत या गाडीचे फोटो पोस्ट केले होते. शिवाय त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे. Samay Raina New Car|
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, समय रैना स्टँड-अप कॉमेडी शो, ऑनलाइन स्ट्रीमिंग आणि युट्यूब व्हिडिओसाठी ओळखला जाता. काही महिन्यांपूर्वी तो ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या वादग्रस्त शोमुळे वादात सापडला होता. Samay Raina New Car|
हेही वाचा:
अफगाणिस्तानसोबतच्या युद्धबंदीवरून कतारचा पाकला मोठा धक्का ; तालिबानने ताकद दाखवली




