कॉमेडीयन भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई; ‘गोला’ झाला मोठा भाऊ

Bharti Singh | सुप्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंह दुसऱ्यांदा आई झाली आहे. भारती सिंह आणि तिचा पती लेखक-निर्माता हर्ष लिंबाचिया यांनी नुकतेच दुसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे.
आज सकाळीच ‘लाफ्टर शेफ‘च्या शूटआधी भारतीला प्रसुतीकळा सुरु झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला दुसऱ्यांदा मुलगा झाला. भारती सिंहला आधीपासूनच एक मुलगा आहे. त्याचं नाव लक्ष्य असं असून त्याला प्रेमानं सर्वजण गोला म्हणून ओळखतात.
ऑक्टोबरमध्ये या जोडप्यानं एका पोस्टद्वारे त्यांच्या दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केली होती. अशातच भारतीनं तिच्या प्रेग्नंसी शूटचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. गेल्या आठवड्यातच भारतीचं डोहाळजेवण झालं होतं. यासाठी अनेक टीव्ही कलाकार आले होते. अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, ऋतिक धनजानी, एल्विश यादवसह अनेक कलाकारांची हजेरी होती.
View this post on Instagram
भारतीने वयाच्या ४१ व्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. भारतीने गुडन्यूज दिल्यानंतर चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. भारतीच्या दुसऱ्या मुलाचीही झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. भारतीने यावेळी मुलगी हवी अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु तिची मुलीची इच्छा पूर्ण होऊ शकली नसली तरी दुसऱ्या बाळाच्या जन्माचा आनंद मोठा आहे. सध्या भारती आणि हर्ष यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा:
Epstein Files : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खरा ठरणार? एपस्टीन फाईल्सवरून खळबळ, दिग्गजांची नावे चर्चेत





