नेवासा : तुमच्या बद्दल आमच्या मनात नेहमीच आदर रहात आलेला आहे आणि येथून पुढेही कायम राहणार आहे. त्यामुळे तुम्ही आमची काळजी करु नका,आम्ही तुमच्या बरोबर सदैव कायमच राहू मात्र आमचे त्यांच्याशी कधीही जमणारच नाही? अशी स्पष्ट कबुली आणि भूमिका सध्या स्थानिक गांवगाड्यातील दोन्ही गटाच्या राजकारण्यांकडून राज्याचे माजी मंञी आमदार शंकरराव गडाख यांच्या घोंगडी बैठकीत दोन्ही गटाचे कार्यकर्ते घेत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे गडाख हे दोन्ही गटाच्या स्वतंञ बैठका घेत असले तरी दोन्हीही गट हे आमदार गडाख यांचेच नेत्तृत्व मान्य करत आहेत.मात्र स्थानिक गांवगाड्याचे राजकारण करण्यासासाठी गावपातळीवर दोन्ही गट हा विरोध कायम ठेवून राजकारणाचा सारिपाट गडाख यांच्या घोंगडी बैठकीत आखताना दिसून येत आहेत. त्यामुळे नेता जरी एक असला तरी गावात दोन गट कायम असून दोन्हीही गटाचा नेता माञ शंकरराव गडाख हेच असून त्यांचा शब्द प्रमाणही गांवगाड्याच्या स्थानिक राजकारणात प्रमाण मानला जात असून हल्लीच्या राजकारणात एकाच नेत्यावर दोन्ही गटाची निष्ठा ही कायम असणारा राजकारणातील दिग्गज नेते आ.गडाख ठरताना दिसून येत आहेत. हल्लीच्या राजकारणात कार्यकर्त्यांची आपल्या नेत्यांवर श्रद्धा आणि निष्ठा ही बाब सध्या राजकारणात दुर्मिळ झालेली असतानाही गडाख हे माञ दोन्ही गटाच्या आपल्या कार्यकर्त्यांना समान वागणूक देत मोठा जीव लावत असल्यामुळे नेवासा तालुक्यातील गांव पातळीवर दोन गट कायम विरोधी राहूनही त्यांचा नेता माञ एकच असल्याची किमया गडाख यांच्या राजकारणातील कार्यपद्धतीतून सिद्ध होताना दिसत असल्यामुळे अशक्याला शक्य करुन दाखविण्याची राजकीय किमया गडाख यांच्या रुपाने जिल्ह्यातील दिग्गज राजकारण्यांना सध्या पहावयास मिळतांना दिसून येत आहे. हल्लीच्या राजकारणात कोणता नेता कधी कुठे प्रवेश करील? आणि काय निर्णय घेईल? याचा काही आता राजकारणात नेम राहीलेला नसतानाही गडाख यांनी सर्वप्रथम विधानसभेत अपक्ष निवडून आल्यानंतर कोणाचे सरकार येईल आणि आपले काय होईल? याचा विचार न करता गडाख यांनी निवडून आल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बिनशर्त पाठींबा दिलेला होता. त्यामुळे शिवसेनेनेही त्यांना कॅबिनेट मंञीपद बहाल केलेले होते त्यांची श्रद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कायमच रहात आलेली असून गडाखांची निष्ठाही तशीच आपल्या कार्यकर्त्यांवरही जैसे थेच असल्यामुळे गांवगाड्याच्या राजकारणात तालुक्यात दोन गट कायम असले तरी दोन्ही गटाचे कार्यकर्ते गडाख यांचेच नेत्तृत्व मान्य करत असल्यामुळे भल्या – भल्या राजकारण्यांना न जमणारी बाब गडाख यांच्याकडून शक्य होत असून एकाच म्यानात दोन तलवारी ठेवूनही ते सध्या गडाखांचे जिवलग सोंगडी बनल्याचे दिसून येत असल्यामुळे गडाख यांच्या राजकारणातील कार्यपद्धतीबाबत जिल्ह्यात एक कुतूलहाचा विषय ठरताना दिसून येत आहेत.