“भारतात परत या आणि…”; एचडी कुमारस्वामींचे प्रज्वल रेवण्णा यांना आवाहन

HD Kumaraswamy And Prajwal Revanna| कर्नाटकमध्ये खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँड प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी भारतातून पळ काढला. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या या प्रकरणानंतर जनता दल (सेक्युलर) पक्षातून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यानंतर आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सोमवारी त्यांचा पुतण्या प्रज्वल रेवन्ना याला देशात परत येऊन तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
एचडी कुमारस्वामी काय म्हणाले ? HD Kumaraswamy And Prajwal Revanna|
एचडी कुमारस्वामी म्हणाले, “प्रज्ज्वल रेवण्णा यांनी भारतात येऊन पोलिसांना तपासात सहकार्य करावं. चोर-पोलिसांचा हा खेळ किती दिवस चालणार? जर तुम्ही राजकारणात पुढे जावे अशी तुमच्या आजोबांची इच्छा होती. आता त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करत असाल तर भारतात परत या”, असं आवाहन कुमारस्वामी यांनी प्रज्ज्वल रेवण्णा यांना केलेआहे.
पुढे एचडी कुमारस्वामी यांनी सेक्स स्कँडल प्रकरणात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे तसेच समर्थकांचे फोन टॅप केले जात आहेत. आमच्यात फोनवर जे काही चालले आहे त्यावर लक्ष ठेवले जात आहे. फोन टॅपिंगद्वारे त्याच्या कुटुंबाची हेरगिरी केली जात आहे, असा आरोप केला. दरम्यान, कुमारस्वामी यांनी केलेल्या आरोप उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी फेटाळून लावत हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
कुमारस्वामी यांनी या सेक्स स्कँडल प्रकरणातील पीडितांची माफी मागितली. ते म्हणाले, “मी पुन्हा एकदा माझ्या माता-भगिनींची जाहीर माफी मागतो. त्यांची मानसिक वेदना मी समजू शकतो. या घटनेमुळे आमची मान शरमेने झुकली आहे.”
या कथित सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा हे कर्नाटकच्या हसन मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. याच मतदारसंघातून ते भाजप-जेडीएस युतीचे उमेदवारही आहेत. जेडीएस पक्षाचे विद्यमान खासदार प्रज्वल यांच्याविरुद्ध तीन महिलांनी लैंगिक अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल केले आहेत. तसेच त्यांच्या सेक्स स्कँडलच्या तीन हजार व्हिडीओ व्हायरल झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. HD Kumaraswamy And Prajwal Revanna|
हेही वाचा:
‘डोळे फुटलेत का तुझे ? …’ BJP उमेदवार कपिल पाटलांनी मतदान केंद्रावर पोलिसांवरच केली दादागिरी





