अहमदनगर – आ. लहू कानडे यांच्या मध्यस्तीनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन तूर्त स्थगित

श्रीरामपूर – बेलापूर बुद्रक येथील बेलापूर-रामगड सेक्शनला जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरवरील वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आमदार लहू कानडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तसेच माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन महावितारणच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला ठाळे ठोकण्याचे आंदोलन तूर्तास स्थगित केले.
बेलापूर बटुक येथील बोरावके, गिरमे, कुऱ्हे, फरगडे, मोरगे, सोनवणे ट्रान्सफॉर्मर यापूर्वी एमआयडीसी सेक्शनला जोडलेले होते. तथापि मागील १५ दिवसांपूर्वी महावितरणने सदर ट्रान्सफॉर्मर (बेलापूर रामगड) सेक्शनला जोडले.सदर सेक्शनवर जास्तीचा लोड शिल्लक नसतानाही ट्रान्सफॉर्मर बेलापूर सेक्शनला जोडल्याने ट्रान्सफॉर्मवरुन अतिशय कमी प्रमाणात वीज पुरवठा होत आहे. एकूए आठ तास मिळणाऱ्या विजेपैकी जेमतेम १ ते २ दोन तास वीज पुरवठा सुरु राहतो. अनेकदा तोही कमी दाबाने मिळतो. त्यामुळे शेतकरी, व्यापारी व इतर ग्राहक जेरीस आलेले आहेत. शेतातील उभे पिक वाळून चालली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. अगोदरच दुष्काळी परिस्थिती, पाण्याची कमतरता यातच बेलापूर बुद्रक येथील वीज पुरवठा बेलापूर-रामगड सेक्शनला जोडल्याने शेतकन्यांना केवळ दोन तास पाणीपुरवठा होत असल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. महावितरणने सदर ट्रान्सफॉर्मर पूर्ववत एमआयडीसी सेक्शनला जोडावा, अन्यथा शेतकरी महावितरणच्या कार्यालयाला ठाळे ठोकतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.
याबाबत आमदार लहू कानडे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता अजय भंगाळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आ. कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्यासह शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीत शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर पूर्ववत एमआयडीसी सेक्शनला जोडण्याची मागणी केली. याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, तोपर्यंत आहे त्याच ट्रान्सफॉर्मरुन वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासान भंगाळे यांनी दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तू र्तास स्थगित केले.





