रंगीबेरंगी ड्रेस अन्….; अभिनेत्री कंगणाचा नवरात्र स्पेशल लुक

Kangana Ranaut : देशभरात नवरात्रीची धूम पाहायला मिळत आहे. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्रीनिमित्त बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावतने देखील पारंपारिक सुंदर लुक केला आहे. कंगणाने गुजराती लूकमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या या लुकमध्ये कंगणाने लाल आणि पिवळ्या रंगाची घागरा-चोली परिधान केली आहे. ज्यासोबत तिने सुंदर दागिने घातले आहे. या फोटोशूटसाठी तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत. सध्या तिचा हा लुक चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत असल्याचे दिसत आहे. या लुकमध्ये कंगणाचे सौंदर्य अधिक खुलले आहे. हे फोटो शेअर करताना कंगणाने ‘तेजससोबत अहमदाबादमध्ये गरब्यासाठी सर्व तयार…’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कंगणाच्या ‘तेजस’ चित्रपटापूर्वीच तिचा हा गरबा लुक चर्चेत आला आहे. रॉनी स्क्रूवालाच्या प्रॉडक्शन हाऊस आरएसव्हीपी मूव्हीजच्या बॅनरखाली बनलेल्या कंगनाच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कंगनाचा ‘तेजस’ चित्रपट येत्या 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.





