भिगवण, (वार्ताहर) – मकर संक्रांतीच्या निमित्त भिगवण ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ महिला आणि नव विवाहित महिलांच्या उखाण्यांनी रंगत आणली. कार्यक्रमासाठी सुसज्ज, भव्य शामियाना उभारण्यात आला होता, त्यात विद्युत रोषणाई करण्यात आली होती, दीपप्रज्वलन व फटाक्यांच्या आतिषबाजीने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी महिलांना वाण म्हणून संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. त्यात सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांनी विविध कलागुण सादर केले. यामुळे उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सरपंच दिपीका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, तृप्ती जाधव, प्रतिमा देहाडे, स्वाती धवडे, तेजस्विनी भोसले, सोनाली वायसे, सईबाई खडके, माधुरी भाकरे, रत्नमाला रायसोनी, डॉ. जयश्री गांधी, यमुना काळे, सुचेता साळुंखे, प्राची थोरात, रेखा खाडे, वंदना थोरात, स्मिता खानावरे, मेघा शेलार, सीमा काळंगे, मीना बंडगर, रेखा क्षीरसागर, आशा चौधरी, सुषमा वाघ, कोमल पांढरे, अस्मिता क्षीरसागर, अर्चना नरुटे व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आपली संस्कृती व परंपरेचे ऋणानुबंध वृद्धिंगत होण्यासाठी तसेच महिलांमधील स्नेह आणि गोडवा कायमचा टिकावा, या उद्देशाने तिळगुळ वाटप आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. -दिपीका क्षीरसागर, सरपंच ग्रामपंचायत भिगवण