करोनाला रोखण्यासाठीच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता- पंतप्रधान

नवी दिल्ली : “कोविड -19′ देशात अधिक पसरू नये, यासाठी विविध अधिकारी विविध स्तरावर समन्वयाने कार्य करीत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटरवर सांगितले.
कोविड -19 विरुद्ध लढा देण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवक कर्मचारी सर्व प्रयत्न करीत आहेत आणि या योगदानाची कायमच कदर केली जाईल.
प्रत्येकजण निरोगी आहे आणि लक्षणे असणाऱ्यांची योग्य काळजी घेतली जाईल, याची विशेष काळजी घेतली जात आहे, असेही मोदींनी सांगितले. प्रत्येकजण एकजुटीने प्रतिसाद देत आहे आणि अशा परिस्थितीत हे देशाचे समर्थ प्रेरक भावना असल्याचे निदर्शक आहे.
अनावश्यक सामाजिक एकत्रीकरण, प्रवास टाळणे आणि घराबाहेर जाणे कमी करणे हा एक चांगला पर्याय आहे. लोकांनी प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे. तरच करोनाचा प्रतिरोध करता येऊ शकेल. लोक निरोगी रहावेत याण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असे आश्वासनही मोदींनी दिले.





