छत्तीसगढ चकमकीत कोब्रा कमांडो शहीद
Updated On:

रायपूर –छत्तीसगढमध्ये गुरूवारी सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झडली. त्यामध्ये एक नक्षली ठार झाला. तर, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका कोब्रा कमांडोला वीरमरण आले. ती घटना बिजापूर जिल्ह्यात घडली. संबंधित जंगलव्याप्त भागात नक्षलींचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बुधवारी सीआरपीएफ जवान आणि पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम हाती घेतली.
त्या माेहिमेत सहभागी जवानांना पाहून गुरूवारी सकाळी नक्षलींनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये कोब्रा कमांडो मेहुल सोलंकी मृत्युमुखी पडले. ते गुजरातचे रहिवासी आहेत. दरम्यान, जवानांच्या माऱ्याला घाबरून नक्षलींनी जंगलाच्या घनदाट भागात पलायन केल्याचे समजते.

