CNG Price News : सीएनजीच्या दरात घट, मध्यरात्रीपासून नवे दर लागू

मुंबई – मुंबई आणि उपनगरात सीएनजी अडीच रुपयांनी स्वस्त झाला आहे. 87 रुपये प्रतीकिलोने आता सीएनजी मिळणार आहे. एका बाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असतानाच सामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
तर दुसरीकडे सीएनजीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत होती. त्या पार्श्वभूमिवर आता पहिल्यांदाच सीएनजीचा दर कमी करण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/maharashtra-big-decision-of-shinde-fadnavis-government-increase-in-amount-of-maharashtra-bhushan-award/
महानगर गॅसकडून पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. दरातील कपात ही मुंबई व उपनगरांपुरतीच असणार असणार आहे, त्यामुळे रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दरात वाढ होत असल्याने सीएनजी व डिजेलच्या किमती जवळपास सारख्या झाल्या होत्या.





