अगोदर पत्रकारांना पेन्शन, आता स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोठी भेट ; नितीश कुमार यांनी केली आणखी एक घोषणा

CM Nitish Kumar । बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भेटवस्तूंचा वर्षाव केला आहे. आज सकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी याविषयी बोलताना, “स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बिहार सरकारकडून एक आयोग स्थापन केला जाणार आहे. हा आयोग स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर सरकारला सूचना देणार आहे असेही त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना, ‘मला हे कळवण्यास आनंद होत आहे की बिहार राज्यातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे आणि हितांचे संरक्षण, कल्याण, पुनर्वसन, सामाजिक उत्थान, तक्रारींचे निवारण आणि विविध कल्याणकारी योजनांचे निरीक्षण सुनिश्चित करण्यासाठी, मी बिहार राज्य सफाई कर्मचारी आयोग स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. हे आयोग स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हिताचे, त्यांच्या हक्कांचे संरक्षणाशी संबंधित सूचनांबाबत सरकारला सूचना देईल आणि स्वच्छता कामात गुंतलेल्या लोकांशी संबंधित कल्याणकारी योजनांचा आढावा घेईल आणि त्या अंमलात आणण्यासाठी योग्य ती कारवाई करेल.’ असे त्यांनी म्हटले आहे. CM Nitish Kumar ।
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढे लिहिले की, ‘बिहार राज्य सफाई कर्मचारी आयोगात एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि पाच सदस्य असतील, ज्यापैकी एक महिला/ट्रान्सजेंडर असेल. राज्यातील स्वच्छता कार्यात सहभागी असलेल्या समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यात आणि त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात हे आयोग महत्त्वाची भूमिका बजावेल.’
नितीश कुमार यांनी पत्रकारांसाठी एक घोषणा केली होती CM Nitish Kumar ।
विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी शनिवारी पत्रकारांसाठी एक मोठी घोषणा केली होती. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून लिहिले की, ‘मला हे कळवण्यास आनंद होत आहे की बिहार पत्रकार सन्मान पेन्शन योजनेअंतर्गत, आता सर्व पात्र पत्रकारांना दरमहा ६ हजार रुपयांऐवजी १५ हजार रुपये पेन्शन रक्कम देण्याचे निर्देश विभागाला देण्यात आले आहेत. तसेच, बिहार पत्रकार सन्मान पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या पत्रकारांच्या मृत्यूच्या बाबतीत, त्यांच्या अवलंबित पती/पत्नीला आयुष्यभर दरमहा ३ हजार रुपयांऐवजी १० हजार रुपये पेन्शन रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकशाहीत पत्रकारांची महत्त्वाची भूमिका आहे. ते लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत आणि सामाजिक विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. पत्रकारांना निःपक्षपातीपणे पत्रकारिता करता यावी आणि निवृत्तीनंतर सन्माननीय जीवन जगता यावे यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच त्यांच्या सुविधांची काळजी घेत आहोत.





