नंदीग्राममधील पराभवाला ममतांकडून न्यायालयात आव्हान; 24 जूनला होणार सुनावणी
Updated On:

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल केली असून, त्या याचिकेवर कलकत्ता उच्च न्यायालयात येत्या 24 जूनला सुनावणी करण्यात येणार आहे.
या सुनावणीसाठी ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष कोर्टात हजर राहणे अपेक्षित आहे. त्यानुसार मुख्यमंत्री या सुनावणीला हजर राहतील, असे त्यांच्या वकिलाने कोर्टात नमूद केले आहे. त्यानंतर कोर्टाने सुनावणीची तारीख निश्चित केली.
नंदीग्रामच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना त्यांचे प्रतिस्पर्धी सुवेंदू अधिकारी यांनी पराभूत केले आहे. तथापि, त्या निवडणूक प्रक्रियेत त्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला, अशी तक्रार ममता बॅनर्जी यांनी केली आहे. निवडणुकीच्या मतमोजणीतही घोळ घातला गेला असे त्यांचे म्हणणे आहे.





