CM Devendra Fadnavis live : “अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नातं दृढ झालं होतं…”; CM फडणवीसांनी काढली दादांची आठवण

गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला होता. दुर्दैवी अपघाताच्या घटनेमुळे आता अर्थ खात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री हा अर्थसंकल्प सादर करताना दिसत आहेत.

Updated On:

CM Devendra Fadnavis live : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा या वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी विधानसभेत सादर करत आहेत. राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे पहिलेच मुख्यमंत्री हा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर या निमित्ताने जमा होणार आहे.

गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला होता. दुर्दैवी अपघाताच्या घटनेमुळे आता अर्थ खात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री हा अर्थसंकल्प सादर करताना दिसत आहेत. तरी गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेला जी दिशा दिली होती ती कायम ठेवण्याचे आव्हान या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये असणार आहे.

अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नातं दृढ झालं होतं… CM Devendra Fadnavis live

राज्याचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांची आठवण काढली. अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नातं दृढ झालं होतं. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख होती. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला साजेसे भव्य स्मारक उभारता येणार आहे अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सन्मान हा पुरस्कार सुरू करण्यात येईल. हा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करतो, असे ते म्हणाले.

गोपिनाथ मुंडे अपघात अनुदान योजना :

गोपिनाथ मुंडे अपघात अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. महिला गोपालक, कुक्कुटपालकांसाठी विशेष योजना करण्यात येणार आहे.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नवीन योजना :

मुंबई येथील हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता जून २०२६ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्यात येईल.तर बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. अंतिम काम जूनपर्यंत होईल. तर योजना पण लवकरच सुरू होईल.

५ ट्रिलियन डाॅलर अर्थव्यवस्था जाणार :

महाराष्ट्र देशात अर्थिक अंजिन असल्याने आपला वाटा मोठा असेल, ५ ट्रिलियन डाॅलर अर्थव्यवस्था जाणार आहे. विकसीत महाराष्ट्राच प्रतिबिंब या अर्थसंकल्पात पाहायाला मिळणार आहे. राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. प्रादेशिक संतुलित विकासासाठी चार प्रमुख स्तंभ ठरवले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Car Accident : भाजप खासदाराच्या कारचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

2026-05-01 23:04:14

Car Accident : भाजप खासदाराच्या कारचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

Maharashtra Politics : राष्ट्रवादीला मोठा धक्का..! अजित पवारांच्या विश्वासू शिलेदाराचे निधन; कोण आहेत सुरेशकुमार जेथलिया

2026-05-01 22:48:34

Maharashtra Politics : राष्ट्रवादीला मोठा धक्का..! अजित पवारांच्या विश्वासू शिलेदाराचे निधन; कोण आहेत सुरेशकुमार जेथलिया

Narhari Zirwal: अखेर सत्य समोर आलं; 'त्या' व्हिडीओबाबत नरहरी झिरवळ यांनी सर्वकाही खरं सांगितलं.....

2026-05-01 18:54:10

Narhari Zirwal: अखेर सत्य समोर आलं; 'त्या' व्हिडीओबाबत नरहरी झिरवळ यांनी सर्वकाही खरं सांगितलं.....

Mumbai Pune Expressway : मिसिंग लिंकचं नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

2026-05-01 17:36:10

Mumbai Pune Expressway : मिसिंग लिंकचं नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट

2026-05-01 16:59:24

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट