महाराष्ट्रात दोन दिवस ढगाळ वातावरण

मुंबई – राजस्थान आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तसेच उत्तर गुजरातपर्यंत हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सोमवारपासून दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव अधिक दिसणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. रविवारी राज्यातील सर्वात नीचांकी ७.६ अंश तापमान धुळ्यात नोंदले गेले. नाशिकमध्ये पारा १३.४ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १३.६ वर होता.
राज्यात रविवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त मात्र वातावरणात दिवसभर गारवा जाणवत होता. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर येथे पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडी अधिक जाणवत आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती येथेही थंडीचा कडाका होता.
प्रमुख शहरांतील किमान तापमान (तापमान अंश सेल्सियस)
-पुणे ११.२
-अहिल्यानगर ९.७
-जळगाव ११.२
-महाबळेश्वर १५.०
-मालेगाव १२.२
-नाशिक १३.४
-सोलापूर १६.२
-संभाजीनगर १३.६
-नागपूर ८.८
-गोंदिया ९.०
-वर्धा १०.२
-यवतमाळ १०.६
-अमरावती ११.९





