यंदा पावसावर ‘चिंतेचे ढग’ ! ‘एल निनो’चा दुसऱ्या टप्प्यात परिणाम होण्याची शक्यता

पुणे -प्रामुख्याने भारतीय उपखंडातील मोसमी पावसावर परिणाम करणारा घटक म्हणून “एल-निनो’ सक्रिय झाल्याने काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढून त्याचा परिणाम मान्सून वाऱ्यांवर होतो. दरम्यान, ही स्थिती ऑगस्टच्या सुमारास निर्माण होण्याचा अंदाज होता. पण, ती आता जूनच्या सुरुवातीलाच निर्माण झाली आहे.
अमेरिकेतील “नॅशनल ओशनिक
ऍन्ड ऍटमॉस्फेरिक हजेरी लावली आहे. त्याशिवाय बंगालच्या उपसागराचा भागही व्यापला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अरबी समुद्राचा मध्य भाग आणि गोवा, महाराष्ट्रच्या किनारपट्टीला मान्सून धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिक उन्हाच्या तडाख्यापासून सुटका मिळण्याची वाट पाहत आहेत. एकीकडे केरळमध्ये पाऊस पोहोचला आहे. पण मुंबईसह राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा चटका बसत आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

एल-निनो स्थिती सध्या सौम्य आहे. जुलैनंतर त्याची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मोसमी पावसावर फारसा परिणाम होणार नाही. पण, जुलैनंतर एल-निनोचा प्रभाव जाणवू शकतो.
– डॉ. अनुपम कश्यपी,शास्त्रज्ञ, हवामानशास्त्र विभाग, पुणे





