Supriya Sule: उत्तराखंडमध्ये ढगफुटीचा कहर…! पुणे जिल्ह्यातील मंचरमधील २४ रहिवासी अडकले, मदतीसाठी सुप्रिया सुळे सरसावल्या

Supriya Sule : उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी दि. ६ अॅागस्ट रोजी उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटीची घटना घडली. नैसर्गिक आपत्तीमुळे हे गाव या महाप्रलयात वाहून गेले आहे. या ढगफुटीसदृश्य पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. या महाप्रलयात चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली असून अनेक जण अडकले आहेत. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्रातील सुमारे दीडशे पर्यटक अडकले असून या पर्यटकांमध्ये पुणे जिल्ह्यातील मंचर येथील २४ रहिवाशांचा समावेश आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून सुळे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मदतीची विनंती केली आहे.
Around 24 citizens from Manchar, Pune, Maharashtra are stranded in Uttarakhand due to the recent cloudburst. Their families are extremely distressed as there has been no contact with them for the past 24 hours.
Requesting Hon. @pushkardhami ji and @ukcmo to kindly intervene and…
— Supriya Sule (@supriya_sule) August 6, 2025
उत्तराखंड येथील ढगफुटीची घटना समोर आल्यानंतर मंचर येथील २४ नागरिक अडकले आहेत. गेल्या २४ तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याने त्यांचे नातेवाईक काळजी करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत अडकलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे. तसेच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.
Horrifying! This zoomed video shows the extent of destruction in Uttarkashi. People seen running, but within seconds everything is swallowed by debris and water. Prayers to the almighty for everyone’s safety. #uttarkashi | #Uttrakhand
pic.twitter.com/XLhmlAZMBz— Nikhil saini (@iNikhilsaini) August 5, 2025
क्षणात होत्याच नव्हत झालं….
खीरगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ झाल्याने नदीने रौद्ररूप धारण केलं आणि अवघ्या काही सेकंदांत किनाऱ्यावरील संपूर्ण वस्ती वाहून गेली. पुराचा खूप मोठा फटका धराली गावाला बसला आहे. पुराच्या तडाख्यात सार काही उद्धवस्त झालं आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून SDRF, NDRF, पोलीस दल आणि सैन्याच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत आणि शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
हेही वाचा : टॅरीफनंतर आता डोनाल्ड ट्रम्पच नवा पायलट प्रोग्राम ! प्रत्येक पर्यटकांकडून ‘एवढे’ पैसे वसूल करणार





