या मास्कमुळे करोना होणार नाही !
Updated On:

मेलबर्न – कापडी मास्क जर दररोज गरम पाण्यात धुतले तर करोना विषाणूचा संसर्ग रोखणे शक्य आहे, असे ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक रैना मॅक्लांटायर यांनी म्हटले आहे.
वापरानंतर कापडी आणि सर्जिकल मास्क दूषितच समजले जावेत. सर्जिकल मास्क एकदाच वापरले जातात. पण कापडी मास्क धुवून पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकतात.
हे मास्क वारंवार वापरण्याच्या शक्यतेमुळेच त्याचे योग्य निर्जंतुकीकरण केले जायला पाहिजे, असे मॅक्लांटायर म्हणाले. अशा निर्जंतुकीकरणासाठी 2015 साली प्रसिद्ध केलेल्या चाचण्यांचा डाटाही संशोधकांकडून तपासला जात आहे.
जर रुग्णालयाच्या कपडे धुण्यासाठी कपड्यांचे मास्क धुण्यात आले तर ते सर्जिकल मास्कसारखे प्रभावी ठरतील, असेही या संशोधकांच्या पथकाच्या निदर्शनास आले आहे.





