पुणे जिल्हा | कापडी पिशव्या घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी
Updated On:

चिंबळी , (वार्ताहर)- कुरुळी येथील आनंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माता – पालक संघातर्फे हळदी कुंकाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पर्यावरण पूरक सर्व महिला भगिनींना ’कापडी पिशव्या घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी’ असा संदेश देणार्या कापडी पिशव्या वाण म्हणून देण्यात आल्या.
या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष डॉ. गजानन मंकीकर व संस्थापक डॉ. अनिल काळे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सरला रेवगडे, तसेच पर्यवेक्षिका भावना पोकळे, तसेच माता पालक संघाच्या अध्यक्ष. शितल कड, उपाध्यक्ष. रुपाली इंदोरे, माता पालक संघाच्या सदस्या, महिला शिक्षक वृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते.





