खूशखबर! कोरोनावरील लसीचा मानवावर प्रयोग

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूने बाधीत माणसांवरील औषधांच्या चाचणी अमेरिकेत सुरू करण्यात आली. त्यामुळे कोरोनाबाबत जगभरात सुरू असणाऱ्या लढ्याला नवे बळ मिळाले आहे. याबाबतची पहिली क्लिनिकल चाचणी सोमवारी घेण्यात आली, असे अमेरिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.
या चाचणसिाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने निधी पुरवठा केला होता. सिएटल येथील कैसर पेरमेनेमट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट येथे ही चाचणी घेण्यात आली. मात्र त्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झाली नसल्याने ही माहिती देणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपली नावे गोपनीय ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या लशीची परिणामकता सिध्द होण्यासाठी आणख 18 महिने लागतील.
पूर्णत: निरोगी असणाऱ्या 45 व्यक्तीच्या शरीरात कोरोना सोडून त्यांच्यावर ही चाचणी घेतली जात आहे. त्यात या चाचणीत सहभागी होणाऱ्यांना बाधा होण्याचा कोणताही धोका नसल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या लशीचे होणारे दुष्परीणाम शोधणे हा या चाचणीचा उद्देश आहे, असे सांगण्यात आले. जगभरातील सुमारे 12 संशोधकांचे गट ही लस शोधण्यासाठी कार्यरत होते.





