कंगणाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगणा राणावतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सेन्सॉरचं प्रमाणपत्र न मिळाल्याने चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अडथळे निर्माण झाले होते. अखेर सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे आता चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
या चित्रपटात कंगणा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते देखील या चित्रपटाबाबत उत्सुक आहेत. हा चित्रपट 6 सप्टेंबरला रिलिज होणार होता पण तो सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता. त्यामुळे, चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार? याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. अखेर सेन्सॉर बोर्डानं ‘इमर्जन्सी’ चित्रपटाबाबत घेतलेल्या आक्षेपानंतर दुरूस्ती होताच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी दिली आहे. Kangana Ranaut |
We are glad to announce we have received the censor certificate for our movie Emergency, we will be announcing the release date soon. Thank you for your patience and support 🇮🇳
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 17, 2024
कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आमचा सिनेमा इमर्जन्सीला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालं आहे. लवकरच आम्ही सिनेमाची रिलीज डेट जाहीर करू. तुमच्या संयम आणि आधारासाठी आम्ही आभारी आहोत.’ Kangana Ranaut |
दरम्यान, कंगनाने ‘इमर्जन्सी’चे दिग्दर्शनही केले असून या चित्रपटाचे लेखन रितेश शाह यांनी केले आहे. मिलिंद सोमण, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. दिवंगत सतीश कौशिक यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. कंगनाने हा चित्रपट तिच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स बॅनरखाली झी स्टुडिओच्या सहकार्याने बनवला आहे.
हेही वाचा:





