पुणे जिल्हा | भोर पंचायत समितीकडून रायरेश्वर गडावर स्वच्छता मोहीम

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – रायरेश्वर (ता.भोर) येथे भोर पंचायत समितीच्या विविध विभागप्रमुखांकडून शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या सुचनेनुसार गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रायरेश्वरला मुक्कामी राहून रायरेश्वर मंदिर परिसरात व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांची स्वच्छता केली तसेच पूतळ्याचे सुशोभिकरण करण्यात आले.
मोदी आवास योजनेतील मंजूर घरकुलांचे भूमीपूजन देखील करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय धनवटे, तालुका आरोग्य अधिकारी जयदीपकुमार कापसीकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब बोरकर, विस्ताराधिकारी बबन चखाले, कृषी विस्तारधिकारी विजय कोळी, कक्षा अधिकारी मिलिंद खोपडे आणि ग्रामसेवक तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.





