पिंपरी | शाळेच्या आवारात रोजच हाणामारी- नागरिक त्रस्त

कामशेत, (वार्ताहर) – येथील पंडित नेहरू विद्यालय येथे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये दररोज हाणामारीचे प्रकार वाढत आहे. त्यास स्थानिक नागरिक वैतागले आहेत. शाळा प्रशास, व्यापारी संघटना तसेच अनेक सामाजिक संघटनेने अनेक वेळा पोलिसांशी संपर्क साधला असून निवेदनही दिले आहे. मात्र, पोलीस कुठली कारवाई करत नाहीत, असा त्यांचा आरोप आहे.
येथे शाळा सुटल्यानंतर रोडरोमिओ दुचाकी वाहने कर्कश आवाजात शाळेच्या बाहेर घिरट्या घालत असतात. शाळेची आवारात अनेक गैरप्रकार घडत आहेत. मात्र, यावर पोलीस प्रशासनाचा कुठलाही अंकुश दिसत नाही. शाळा प्रशासनाने शाळा भरल्यानंतर व सुटल्यानंतर पोलिसांची गस्त घालण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे. पण तसे होताना दिसत नाही.
दररोजच्या प्रकारामुळे नागरिक मात्र हैरान झाले आहेत. शाळेच्या आवरा सीसीटीव्ही कॅमेरा असूनसुद्धा असे प्रकार घडत आहे. यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहे
पोलीस स्टेशनला वारंवार निवेदन देऊन पोलीस स्टेशनमध्ये दखल घेतली जात नाही. पोलीस गंभीर घटना घडण्याची वाट पाहत आहे, असा आरोप सह्याद्री विद्यार्थी अकादमी अध्यक्ष सहदेव केदारी यांनी केला.





