CJP protest : पोलिसांना चकवा देत CJP ने जंतरमंतर गाठले ! अजिंक्य शिंदे, सौरव दास अन् आशुतोष रांका पुन्हा ताब्यात
CJP protest : नवी दिल्लीतील जंतरमंतर परिसरात दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेत्यांनी मंगळवारी पहाटे जंतरमंतरवर धडक दिली.

CJP protest : नवी दिल्लीतील जंतरमंतर परिसरात दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेत्यांनी मंगळवारी पहाटे जंतरमंतरवर धडक दिली.
अभिजित दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाची जबाबदारी स्वीकारलेले अजिंक्य शिंदे, पक्षाचे सह-संयोजक आशुतोष रांका आणि सौरव दास हे आपल्या सहकाऱ्यांसह अचानक आंदोलनस्थळी पोहोचले. (CJP protest)
हातात तिरंगा घेऊन घोषणाबाजी करत आंदोलक दाखल होताच पोलिसांची धावाधाव उडाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अजिंक्य शिंदे, आशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह इतर आंदोलकांना पुन्हा ताब्यात घेतले.
कडक नाकेबंदीनंतरही आंदोलक जंतरमंतरवर (CJP protest )
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर, संसद मार्ग आणि कनॉट प्लेस परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. मात्र, या बंदोबस्ताला चकवा देत CJP चे नेते आणि कार्यकर्ते मंगळवारी सकाळी जंतरमंतरवर पोहोचले.
Cockroaches with the Tiranga sneaked into Jantar Mantar early this morning before they were picked up by Delhi Police.
@AshutoshRanka, @SauravDassss, @AjinkyaCJP along with other team members have been detained.
You cannot denotify the resistance, @narendramodi https://t.co/x7B40akCVO
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 13, 2026
हातात तिरंगा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी (CJP protest)
जंतरमंतरवर दाखल झाल्यानंतर आंदोलकांनी हातात राष्ट्रध्वज घेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच मतदार यादीत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. आंदोलक जंतरमंतरवर पोहोचल्याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी सौरव दास, अजिंक्य शिंदे, आशुतोष रांका यांच्यासह इतर आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस व्हॅनमधून अन्य ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती आहे.
नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार (CJP protest )
CJP चे प्रमुख अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचे नेतृत्व करतील, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जंतरमंतरवर पोहोचून आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.
Save Democracy https://t.co/l2y2BhyzzC
— Cockroach Janta Party – CJP (@Cockroachisback) October 13, 2026
एकीकडे पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू असताना दुसरीकडे CJP चे कार्यकर्ते आंदोलन सुरू ठेवण्यावर ठाम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन आणि पोलिसांची कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





