CJP Parliament March: संसद मोर्चा सुरू होताच पोलिसांचा लाठीचार्ज ; जंतर मंतरवरील संघर्षानंतर आरएएफकडून कारवाई
CJP Parliament March:कॉकरोच जनता पक्षाच्या संसद मोर्चाला जंतरमंतर याठिकाणावरून सुरुवात झाली आहे.

CJP Parliament March: कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मोर्चाला जंतरमंतर याठिकाणावरून सुरुवात झाली आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली, खासदार चंद्रशेखर आझाद आणि प्रकाश राज हेही आंदोलकांसोबत आहेत. (CJP Parliament March)
दरम्यान , मोर्चा सुरु होताच आंदोलन कर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे सांगण्यात येत आहे.
जंतरमंतरवर संसदेचा मोर्चा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलक आणि आरपीएफ जवानांमध्ये झालेल्या संघर्षानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचे म्हटले जात आहे. त्या संबंधीचे व्हिडीओ सध्या समोर येत आहेत.
#WATCH | Delhi | Protesters gathered for CJP’s protest march clash with RPF personnel at Jantar Mantar; RPF personnel & police use lathis for crowd control pic.twitter.com/gijaCjJksW
— ANI (@ANI) July 20, 2026
कॉकरोच जनता पार्टीकडून आज संसदेवर मोर्चा काढणार आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी यासाठी परवानगी दिलेली नाही. मर्यादित परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, जंतर मंतरवर सुमारे 10 हजारांवर आंदोलक जमले आहेत. दरम्यान , या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपचे नेते देखील याठिकाणी दाखल झाले आहेत. (CJP Parliament March)





