CJI Surya Kant: “न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले, पण आम्ही…” ; राहुल गांधींच्या मागणीवर सरन्यायाधीशांचे मोठे विधान
CJI Surya Kant: इंडिया कोएलिशनच्या नेत्यांना भेटण्याची विनंती फेटाळण्यात आल्यानंतर, सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे.

CJI Surya Kant: इंडिया कोएलिशनच्या नेत्यांना भेटण्याची विनंती फेटाळण्यात आल्यानंतर, सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी इंडिया आघाडीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. “आम्ही कोणतीही याचिका ऐकून घेऊ, मग ती सामान्य नागरिकाची असो वा सन्माननीय सदस्याची,” असे म्हटले आहे.
ते म्हणाले, “भारताच्या प्रत्येक नागरिकाला आमच्याकडे येण्याचा हक्क आहे. आम्ही कायद्यानुसार आणि नियमानुसार त्यांच्या समस्या ऐकून घेऊ आणि आम्ही निश्चितपणे प्रत्येकाला त्यांचे हक्क देऊ.” (CJI Surya Kant)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भात सरन्यायाधीशांना भेटण्याची विनंती केली होती. त्यांनी इंडिया कोएलिशनच्या नेत्यांची नावे सुचवली होती. दरम्यान, राहुल गांधी आज सर्वोच्च न्यायालयाकडे मोर्चा काढणार आहेत. (CJI Surya Kant)
खरगे यांचे ‘हे’ म्हणणे (CJI Surya Kant)
काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी रविवारी सांगितले होते की, लोकशाही हक्कांची कथित गळचेपी, आंदोलकांवरील पोलीस कारवाई आणि निवडणूक आयोगातील अनियमितता हे मुद्दे उपस्थित करण्यासाठी ते आणि राहुल गांधी ( Rahul Gandhi) १२ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश सूर्यकांत यांची भेट घेतील.
या काळात खर्गे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. देशात “अघोषित आणीबाणी” पसरली आहे, असे त्यांनी म्हटले होते.
भाजपचा निशाणा (CJI Surya Kant)
राहुल गांधींना भेटण्यास नकार दिल्याबद्दल भाजपने सरन्यायाधीशांवर निशाणा साधला आहे. भाजप नेते गौरव भाटिया यांनी लिहिले, “राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटण्यास सरन्यायाधीशांनी दिलेला नकार एक महत्त्वाचा संदेश देतो: न्यायपालिकेला रोजच्या राजकीय नाटकांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.
घटनात्मक संस्था विरोधी पक्षांच्या राजकीय निराशेचे व्यासपीठ बनू शकत नाहीत. श्री. राहुल गांधी, केवळ संविधान सोबत बाळगल्याने कोणी ज्ञानी होत नाही. कृपया ते वाचण्यासाठी वेळ काढा! विशेषतः सत्ता विभाजनाचे तत्त्व. संविधान ही केवळ शोभेची वस्तू नाही; ते लोकशाहीचे सार आहे.”





