CJI DY Chandrachud: निरोप समारंभात डी.वाय. चंद्रचूड झाले भावूक; म्हणाले – ‘…तर मी नम्रपणे माफी मागतो’

CJI DY Chandrachud: भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांना रविवारी पदावरून मुक्त करण्यात येणार आहे. मात्र शनिवार व रविवार, 9 व 10 रोजी न्यायालयीन सुटी असणार आहे. त्यामुळे आज त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात आज त्यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे 10 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांची जागा घेतील. ते देशाचे 51 वे सरन्यायाधीश असतील. जस्टिस चंद्रचूड यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. 13 मे 2016 रोजी त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयातून बढती मिळाली होती.
‘मी लहान असताना सुप्रीम कोर्टात आलो आणि कारवाई पाहिली’ –
निरोप समारंभात न्यायमूर्ती चंद्रचूड भावूकपणे म्हणाले, ‘रात्री मी विचार करत होतो की दुपारी 2 वाजता कोर्ट रिकामे होईल आणि मी स्क्रीनवर स्वतःला पाहत आहे. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने मी भारावून गेलो आहे. CJI म्हणाले, ‘मी लहान असताना सर्वोच्च न्यायालयात यायचो आणि इथली कार्यवाही आणि कोर्टात लावलेली दोन छायाचित्रे पाहायचो.
#WATCH | While addressing his farewell function, Chief Justice of India DY Chandrachud says “Thank you so much for such a great honour…I would like to thank from the bottom of my heart the Supreme Court Bar Association for organising this event…My mother told me when I was… pic.twitter.com/YJy44SL6Qz
— ANI (@ANI) November 8, 2024
‘आम्ही सगळे प्रवासी आहोत, थोड्या वेळासाठी येतो…’
ते पुढे म्हणाले, ‘आम्ही सगळे इथे प्रवाशांसारखे आहोत, जे काही वेळासाठी येतात, आपलं काम करतात आणि मग जातात. न्यायालयाच्या रूपाने ही संस्था कायम सुरू राहील आणि विविध विचारांचे लोक येथे येतच राहतील. माझ्यानंतर न्यायमूर्ती खन्ना या संस्थेला ताकदीने आणि सन्मानाने पुढे नेतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्यासोबत केलेले काम कायम आठवणीत राहिल.
‘माझ्यामुळे कोणाला काही त्रास झाला असेल तर मला माफ करा…’
चंद्रचूड म्हणाले, ‘मी आज खूप काही शिकलो आहे. कोणतीही केस पूर्वीसारखी नसते. कोर्टात माझ्यामुळे कोणाला काही त्रास झाला असेल तर मी नम्रपणे माफी मागतो. शेवटी आभार मानताना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने येथे आलात. यासाठी मी सदैव ऋणी राहीन.





