नगर – महिला सरपंच विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा

नगर – नगर तालुक्यातील शेंडी येथील महिला सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांनी गावातीलच महिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना गुरूवारी (दि. १५) दुपारी घडली. याप्रकरणी सरपंच लोंढे विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शिवीगाळ, दमदाटी, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हिरा रावसाहेब नेटके (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हिरा नेटके या सरपंच लोंढे यांना मांग समाजाच्या स्मशानभूमीमध्ये खड्डा घेऊ नको, असे म्हणाल्या होत्या. याचा राग येऊन सरपंच लोंढे यांनी फिर्यादीसह अलका गोरख ससाणे, सुनीता नेटके, काजल ससाणे, शांता नेटके, छाया नेटके यांना जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटना घडल्यानंतर पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, सहा.पोलीस निरीक्षक मााणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. शिवीगाळ, दमदाटी, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपअधीक्षक भोसले करीत आहेत.





