कामशेत – येथील पंडित नेहरू विद्यालयाच्या परीक्षा केंद्रात कोविड -19 चे सर्व नियम पाळून परीक्षा घेतली जाणार आहे. या केंद्राला संलग्न सात उपकेंद्र असणार आहेत. यामध्ये एकून 709 विद्यार्थी परिक्षा देनार आहेत. मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली या पररिक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
उद्यापासून (दि.15) दहावीची परीक्षा सुरू होत असून परीक्षेच्या नियोजना संदर्भातील बैठक नुकतीच पंडित नेहरू विद्यालयात पार पडली. पंडित नेहरू विद्यालय कामशेत या मुख्य केंद्रात 340 परिक्षार्थी असून, केंद्राला संलग्न सात उपकेंद्रे आहेत.
उषाताई लोखंडे चॅरीटेबल ट्रस्ट माध्यमिक विद्यालय, सांगिसे 23 परीक्षार्थी, एकविरा माध्यमिक विद्यालय, कार्ला 77 परीक्षार्थी,गोल्डन ग्लेज माध्यमिक विद्यालय, करंजगाव 110 परीक्षार्थी, महर्षी कर्वे आश्रम शाळा, कामशेत 40 परीक्षार्थी, जैन इंग्लिश स्कूल, कामशेत 58 परीक्षार्थी, व्ही. आय. टी. कॉलेज, खामशेत 34 परीक्षार्थी, जिजस हायस्कूल, खामशेत 27 परीक्षार्थी, असे एकूण 709 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. केंद्र संचालक प्राचार्य अजिनाथ ओगले म्हणाले, यावर्षी परीक्षेसाठी बोर्डाने अर्धा तासाचा वेळ वाढवून दिला आहे. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ दिला आहे.