Yusuf Pathan : “देशभरातील नागरिक मतदानाच्या हक्कासाठी आवाज उठवत आहे” – खा. युसूफ पठाण
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची मागणी एनसीपीआय अध्यक्ष ज्योती प्रकाश चॅटर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार युसूफ पठाण यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Yusuf Pathan – तृणमूल काँग्रेसमधून ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’मध्ये (एनसीपीआय) दाखल झालेले खासदार युसूफ पठाण यांनी पश्चिम बंगालसह देशभरातील नागरिक मतदानाच्या हक्कासाठी आवाज उठवत असल्याचे म्हटले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची मागणी एनसीपीआय अध्यक्ष ज्योती प्रकाश चॅटर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार युसूफ पठाण यांनी ही प्रतिक्रिया दिली.
बंगाल, मुर्शिदाबाद, बहरामपूर आणि देशभरातील लोक आपल्या मतदानाच्या हक्कासाठी आवाज उठवत आहेत. अशा वेळी मी एखाद्या पुरस्काराची शिफारस करेन का? असे पठाण यांनी सोशल मिडियावरील पोस्टमध्ये म्हटले.
आपल्या नावाने कोणतेही पत्र पाठवले नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी संबंधित पत्राची प्रत सार्वजनिक करण्याचे आव्हान दिले. पुरावा सादर करा, अन्यथा ते पत्र बनावट आणि माझ्या नावाचा गैरवापर असल्याचे समजावे, असे ते म्हणाले.
एनसीपीआय अध्यक्ष ज्योती प्रकाश चॅटर्जी यांनी आपल्या पत्रात २०२६च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका हिंसा, धमकावणी आणि गैरप्रकारांशिवाय पार पडल्याचा दावा करत निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे.
दरम्यान, पठाण यांनी ऑगस्टमध्ये एनसीपीआयचे खासदार अबू ताहिर खान आणि खलीलुर रहमान यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मतदार यादीच्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’नंतर (एसआयआर) वगळण्यात आलेल्या नावांबाबत चिंता व्यक्त केली होती.
प्रलंबित प्रकरणे जलद निकाली काढणे आणि अतिरिक्त न्यायाधिकरणे व तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची मागणी त्यांनी केली होती.





