सीआयएससीईच्या दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर

पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेश (सीआयएससीई) बोर्डाच्या वतीने आयसीएसई म्हणजेच इयत्ता दहावी व आयएससी म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
विद्यार्थी अधिकृत वेबसाइट https://cisce.org वर जाऊन डेटशीट डाउनलोड करू शकतात. दहावीच्या परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि २७ मार्च २०२५ पर्यंत चालतील, तर बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा १३ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होतील आणि ५ एप्रिल २०२५ रोजी संपतील. प्रश्नपत्रिकेत दिलेल्या वेळेव्यतिरिक्त, उमेदवारांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी अतिरिक्त १५ मिनिटे मिळतील.
विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या निर्धारित वेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे बोर्डाने कळविले आहे.
दहावीचा इंग्रजी भाषेचा पेपर पहिल्या दिवशी म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात येईल. पर्यावरण शास्त्राचा पेपर परीक्षेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २७ मार्च २०२५ रोजी होईल. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत परीक्षा होणार आहे, तर आयएससीची परीक्षा पर्यावरण विज्ञान या विषयाने सुरू होईल.





