Virat Kohli Deactivate Instagram Account: क्रिकेटपटू विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळेच शुक्रवारी सकाळी विराटचं इंस्टाग्राम अकाउंट अचानक दिसेनासं झाल्यावर अनेक चाहते गोंधळले आणि अस्वस्थ झाले. सोशल मीडियावर विराटची आयडी सापडत नसल्याने चाहत्यांनी थेट त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्माच्या इंस्टाग्राम अकाउंटवर धाव घेतली. विराटच्या अनुपस्थितीमुळे चिंतेत पडलेल्या चाहत्यांनी अनुष्काच्या पोस्टखाली कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. काही दिवसांपूर्वी अनुष्काने विराटसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याच व्हिडीओवर चाहत्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. Anushka Sharma Virat Kohli एका चाहत्याने लिहिलं, “भाभी, भैयाची आयडी कुठे गेली?” तर दुसऱ्याने कमेंट केली, “किंग भैया, अकाउंट परत अॅक्टिव्ह करा, आता मजाक नको.” आणखी एका चाहत्याने लिहिलं, “भाभी, विराट भैया इंस्टाग्रामवर सापडत नाहीयेत, जरा बोलवा त्यांना.” विराट कोहलीच्या सोशल मीडिया अकाउंटबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, चाहत्यांमधील ही उत्सुकता आणि काळजी सोशल मीडियावर स्पष्टपणे दिसून येत आहे.