प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचालनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाही; गुजरातसह ‘या’ राज्यांना मिळाली संधी

Maharashtra Chitrarath | आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचालनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला तूर्तास परवानगी मिळालेली नाही. २६ जानेवारी २०२५ रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले. या यादीत महाराष्ट्राला स्थान मिळालेले नाही.
मागच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने मराठी रंगभूमीच्या १७५ वर्षांच्या इतिहासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षाचा चित्ररथ सादर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र अखेरच्या क्षणी तो मंजूर करण्यात आला होता.
महाराष्ट्राला 14 वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक
1971 पासून ते 2023 पर्यंत महाराष्ट्राला 14 वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळाले आहे. 7 वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले, चार वेळा दुसरे आणि 2 वेळेस तृतीय पारितोषिक मिळाले आहे. सलग तीन वर्षी सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकविण्याचा विक्रमही राज्याने केला आहे. मात्र यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथला परवानगी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
तर दुसरीकडे, गेली अनेक वर्षे संधी नाकारल्या जाणाऱ्या राजधानी दिल्लीच्या चित्ररथालाही परवानगी नाकारण्यात आल्याचे राज्य सरकारला कळविण्यात आले आहे. दिल्ली सरकारने यंदा जो चित्ररथाचा प्रस्ताव दिला, तो निकषांतच बसत नसल्याचे कारण सांगत तो नाकाराला असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र, दिल्ली सरकारच्या प्रस्तावाचा तपशील मंत्रालयाने दिलेला नाही. Maharashtra Chitrarath |
कोणत्या राज्यांना मिळाली संधी?
2025 च्या चित्ररथ संचालनाच्या यादीमध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड ही राज्ये आहेत. तर चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश संचालनामध्ये सहभागी होणार आहेत. मिझोराम, सिक्कीम या राज्यांनी कार्यक्रमात भाग घेण्यास नकार दिला. तर अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपचे प्रतिनिधी समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांना ही संधी मिळू शकली नाही.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये विजयपथावर पथसंचलनासह देशाच्या विविधतेमधील एकतेचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विविध राज्यांकडून केले जाणारे चित्ररथाचे सादरीकरण हा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे प्रत्येक राज्याकडून आपल्या चित्ररथाचे प्रदर्शन व्हावे, यासाठी प्रयत्न केला जातो. Maharashtra Chitrarath |
हेही वाचा:





