चित्रांगदा सिंह लवकरच एका वेब सिरीजच्या माध्यमातून डिजीटल एन्टरटेनमेंट विश्वामध्ये पदार्पण करणार आहे. या वेब सिरीजमध्ये ऍक्टिंग करण्याबरोबरच ती या वेब सिरीजचे प्रॉडक्शनही करणार आहे. हा एक म्युझिकल ड्रामा असणार आहे आणि त्याचे शुटिंग या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या चित्रांगदाकडे थोडावेळ शिल्लक आहे.
2003 मध्ये “हजारो ख्वाईशें ऐसी’मधून पदार्पण करणाऱ्या चित्रांगदाला आता निर्मितीतीत जम बसवायचा आहे. आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीमध्ये चित्रांगदाने अर्धा डझन सिनेमांबरोबर काही सिनेमांमध्ये स्पेशल सॉंगपण केले आहेत. 2017 मध्ये हॉकी खेळाडू संदीप सिंहच्या बायोपिक “सूरमा’च्या माध्यमातून चित्रांगदाने प्रॉडक्शन हाऊसला सुरुवात केली आहे. “सूरमा’मध्ये दलजीत दोसाज आणि तापसी पन्नू हे लीड रोलमध्ये होते.
या वेब सिरीजच्या प्रॉडक्शनची जबाबदारीही चित्रांगदावर असल्याने वेबसिरीजच्या प्रॉडक्शनची जुळवा जुळव ती करणार आहे. याशिवाय बऱ्याच दिवसात तिने कोणत्याच बॅनरसाठी ऍक्टिंग केलेली नाही. पण आता स्वतःच्याच बॅनरसाठी ऍक्टिंग करण्याचा आनंद तिला मिळणार आहे.