मनीषा कायंदेंनी पोस्ट केलेल्या फोटोवर चित्रा वाघ संतापल्या म्हणाल्या,”घरात बसून चकाट्या…”

मुंबई – उर्फी जावेद प्रकरणाला पूर्णविराम लागला असं वाटत असतानाच ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांना डिवचत एक सवाल उपस्थित केला. कायंदे यांनी एका शरीरसौष्ठव स्पर्धेतील फोटो पोस्ट करत चित्रा वाघ यांना हा नंगाटनाच मान्य आहे का ? असा सवाल उपस्थित केला होता. आता वाघ यांनी देखील कायंदेच्या या प्रश्नाला उत्तर देत एक पोस्ट केली आहे.
काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ या मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद विरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. उर्फीच्या ड्रेसिंगवरून वाघ यांनी अनेक आक्षेप नोंदवत तिला इशारा देखील दिला होता.यानंतर वाघ यांनी सुरु केलेले हे उर्फी जावेद प्रकरण संपले असे वाटत होते. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतील एक जुना फोटो वापरात मनीषा कायंदे यांनी चित्रा वाघ यांना जाब विचारला. या फोटोमध्ये मंत्री नितीन गडकरी एका शरीर सौष्ठव स्पर्धा विजेत्या महिलेला पुरस्कार देताना दिलेत आहेत.
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) January 24, 2023
चित्रा वाघ यांनीं याबाबत ट्विट करत “शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला ताई ? असा पलटवार मनीषा कायंदे यांच्यावर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या पुढे म्हणतात,”खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी घेणारे आमचे नेते नितीनजी गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत शरीरसौष्ठव स्पर्धेचे. असो.. कायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे?” असा टोला देखील यावेळी वाघ यांनी लगावला आहे.
शरीरसौष्ठव स्पर्धा कळतात का तुम्हाला @manisha_kayande ताई ?
खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी घेणारे आमचे नेते नितीनजी गडकरी पुरस्कार वितरण करीत आहेत शरीरसौष्ठव स्पर्धेचे
असो॰कायम घरात बसून केवळ चकाट्या पिटणाऱ्यांना ते कळणार तरी कसे …?@CMOMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/vwiqMJmygh
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 24, 2023
ही खडाजंगी मनीषा कायंदे आणि चित्रा वाघ यांच्यात झाली असली तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा उर्फी जावेद हे नाव चर्चेत आलं आहे. उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला होता. मात्र आता पुन्हा एकदा उर्फीचे नाव चर्चेत आले आहे.





