मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एका व्हिडीओमुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोले यांचा एका महिलेच्या खांद्यावर हात टाकून बसलेला एक तथाकथित व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यावरून त्यांना आता प्रश्न विचारण्यात येत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करत नाना पटोले यांना, ‘काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं’ असा प्रश्न विचारला आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, हा व्हिडीओ बनावट असल्याचा दावा करत ही आपल्याला बदनाम करण्यासाठी रचलेली चाल असल्याचे सांगितले आहे. न्याय विभागातर्फे याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे देखील पटोले म्हणाले.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर एक पत्रकार परिषद देखील घेतली. नाना पटोले यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी याबाबत समोर येऊन भूमिका मांडावी असे चित्रा वाघ म्हणाल्या.
चित्रा वाघ यांनी ट्विट केलेला व्हिडीओ
काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं….🤭🫣@NANA_PATOLE @INCIndia @MumbaiPMC @INCMumbai pic.twitter.com/7GnKQ2t6jW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 20, 2022
(टीप – चित्रा वाघ यांच्या ट्विटर खात्यावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओची सत्यता डिजिटल प्रभाततर्फे तपासण्यात आलेली नाही.)